Sushil Kumar Shinde | माहित नाही माझ्या शब्दला काही किंमत आहे किंवा नाही…काँग्रेस लीडरशिपवर सुशीलकुमार शिंदे यांनीही उपस्थित केला प्रश्न

मुंबई न्यूज (mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – काँग्रेस (Congress) मध्ये असहमतीचे सूर सातत्याने वाढत चालले आहेत. आता माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे (former Union Minister and Senior Leader Sushil Kumar Shinde) यांनी सुद्धा पक्षाच्या सध्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. लाइव्ह हिंदूस्तानने हे वृत्त दिले आहे. यामध्ये सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी म्हटले आहे की, आता पक्षाच्या कार्यशैलीत खुप बदल झाला आहे. काँग्रेसमध्ये डिबेट करणे आणि संवादासाठी सेशन करण्याची संस्कृती होती, आता ती संपली आहे. मी यासाठी दुःखी आहे. आत्मचिंतनासाठी बैठका होणे आवश्यक आहे. आमचे धोरण चुकीचे असू शकते, परंतु आपण ते ठिक करू शकतो. अशा सेशन्सची आवश्यकता आहे.Sushil Kumar Shinde | now former home minister sushil kumar shinde raises question over congress leadership

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

इतकेच नव्हे, त्यांना बाजूला केल्याचे दुखसुद्धा त्यांनी जाहीर केले. शिंदे यांनी म्हटले की, एक काळा होता, जेव्हा काँग्रेस पक्षात माझ्या शब्दला काही किंमत होती, परंतु मला माहित नाही की आता आहे किंवा नाही. काँगेस आपल्या विचारधारेची संस्कृती आता गमावत चालली आहे.

काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे (Congress leader Sushil Kumar Shinde) यांनी म्हटले, एक काळा होता जेव्हा काँग्रेस शिबिर कार्यशाळा आयोजित करत होती, या शिबिरात मंथन होत असे की, पक्ष कुठे चालला आहे. परंतु सध्या हे समजणे अवघड आहे की, अखेर पक्ष कुठे चालला आहे.

सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले की, आता चिंतन शिबिराचे आयोजन केले जात नाही, मी यामुळे खुप दुखी आहे. सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. यूपीए सरकारमध्ये शिंदे यांच्याकडे गृह मंत्रालयासारखी महत्वाची जबाबदारी होती.

आता सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आमदार आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पक्षाच्या कार्यकारिणीत सुधारणा करत सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्र राज्य युनिटचे अध्यक्ष केले होते.
गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि वीरप्पा मोइली यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर यापूर्वी प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतकेच नव्हे पक्षात व्यापक फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
मात्र, अशा नेत्यांच्या सल्ल्याकडे पक्षातील बंडखोर गट म्हणून पाहिले जात आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  Sushil Kumar Shinde | now former home minister
sushil kumar shinde raises question over congress leadership

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया