Video : काठीने मारहाण करतानाचा पहेलवान सुशील कुमारचा व्हिडिओ आला समोर, सोशल मीडियावर होत आहे वायरल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ऑलिंपिकमध्ये दोन वेळा पदक विजेता असलेला पहेलवान सुशील कुमार(sushil kumar) च्या अडचणी वाढत चालल्या आहेत. 4 मे रोजी झालेल्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियन पहेलवान सागर राणाच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या सुशील कुमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खुप वेगाने वायरल होत आहे. या वायरल व्हिडिओमध्ये तो काही साथीदारांसह दुसर्‍या बाजूच्या पहेलवानांना निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ राणा हत्याकांडातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत दिसत आहे की, कशा प्रकारे सुशील काही साथीदारांसोबत मिळून खुलेआम लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहे. वायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, सुशीलसह इतरही लोक दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशीलचा मार्ग आणखी अवघड होत चालला आहे.

Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

 

सुशील कुमारला रविवारी सहकारी पहेलवान सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली होती. यानंतर त्यास दिल्लीच्या एका कोर्टाने 6 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये पाठवले. त्याच्यावर हत्या, खंडणी आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप आहे.

मृत पहेलवान सागरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. सूत्रांनुसार, सागरचा मृत्यू डोक्यावर वजनदार वस्तूने वार केल्याने झाला आहे. एखाद्या लोखंडी रॉडने किंवा काठीने खुप ताकदीने मारल्याने सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोकं फुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत त्याची प्रकृती खुपच खालावली होती. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. काहीवेळातच सागरचा मृत्यू झाला होता.

Also Read this : 

केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या

फायद्याची गोष्ट ! रोज फक्त 1 रूपया वाचवून बनवा 15 लाखांचा फंड, जाणून घ्या

उन्हाळ्यात ‘या’ पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, कधीच नाही होणार परेशानी; जाणून घ्या

.करोडपती बनण्याचा चान्स ! ‘हे’ काम करा अन् Google कडून व्हा ‘मालामाल’, 7 कोटींचं बक्षीस मिळवण्याची सुवर्णसंधी