Sushilkumar Shinde | कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला घरचा आहेर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्वत:च्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमधील (Congress) कटकारस्थानाचा पाढा त्यांनी वाचला. पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री (CM) पदावरुन हटवले आणि राज्यपाल (Governor) म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं. पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात (Delhi Cabinet) गेलो. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, असा आरोप सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केला. तसेच मला कसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं काय कारस्थान झालं हे मी विसरु शकत नाही, असेही ते म्हणाले.

सोलापूर शहरातील गुजराती मित्र मंडळ (Gujarati Mitra Mandal) येथे गुजराती समाजाची वार्षिक बैठक होती. यावेळी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर बोलताना त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.
गुजराती समाजासाठी काय केलं याबाबत देखील त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

जावई गुजराती असल्याने…

गुजराती समाजाला आरक्षण (Gujarati Community Reservation) दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले. जावयाला सांभाळायचे म्हंटल्यावर हे सगळे करावे लागते.
हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. साधी गोष्ट नव्हती.
पण आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरुन चाललेत असे विधान गुजराती मित्र मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान शिंदे यांनी केले.

मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते.
तेवढे एक चांगले काम मी केले होते. पण लोक आता विसरुन गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केलं.
जावयाला साभांळायचं म्हटल्यावर हे सगळं करावं लागतं, असंही ते म्हणाले.

Web Title :- Sushilkumar Shinde | I was removed from the post of Chief Minister by conspiracy, Sushilkumar Shinde’s anger at the party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena MLA Nitin Deshmukh | ‘…तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन’, नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा

Pune Accident |  हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात