सोलापूरात सुशीलकुमार शिंदे लागले लोकसभेच्या तयारीला

सोलापूर | पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री असताना झालेला पराभव सुशीलकुमार शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याची त्यांनी कधी जाहीर वाच्चता केली नव्हती परंतु आगामी लोकसभेच्या सोलापुरातील तयारीसंदर्भातील  त्यांच्या हालचाली या गोष्टीची साक्ष देणाऱ्याच आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शरद बनसोडे या नवाट प्रतिस्पर्धीने त्यांना पराभूत केले होते. याचे शल्य शिंदे यांच्या मनात सामावलेले आहे असे त्यांच्या हालचालीतून दिसून येते. लोकसभेवर  निवडून गेल्यावर कधीच मतदारसंघात न फिरकलेल्या शिंदेंवर येथील जनता नाराज होती.  आपल्या मतावर शिंदे दिल्लीत जाऊन मंत्री झाले परंतु आपल्याकडे साधे लक्ष हि नाही असा तेथील जनतेचा सूर होता म्हणूनच त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला असा सरळ सोट अनुमान काढला जातो. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून भाजपच्या उमेदवाराला पडायचेच असा चंगच सुशीलकुमार शिंदे यांनी बांधला आहे.

भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत होतं का? : अशोक चव्हाण

भाजपच्या गटबाजीचा फायदा करून घेण्याची रणनीती 
सोलापूर भाजपमध्ये सध्या दोन गट निर्माण झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा गट आणि ना. सुभाष देशमुख यांचा दुसरा गट असे दोन गट सध्या कार्यरत आहे. लिंगायत मतदारांच्या जोरावर आपले राजकारण फुलवलेल्या विजयकुमार देशमुख यांनी आपली ताकद पक्षाला दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. तर लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून सुभाष देशमुख यांचा संपर्क तगडा आहे. भाजपच्या गोटात सध्या लोकसभेचा उमेदवार कोण असणार या मध्ये एकमत नाही त्याचा हि सुशीलकुमार शिंदे पुरेपूर फायदा घेत आहेत.

शिंदेचा कार्यकर्ता जोडो कार्यक्रम 
मागील काही दिवसात त्यांनी कार्यकर्ता प्रशिक्षणाची दोन शिबिरे सोलापुरात घेतली आहेत तर  दोन दिवसापूर्वी झालेल्या कार्यकर्ता शिबिरात त्यांनी सोलापूरच्या हातमाग उद्योगाबद्दल प्रधानमंत्री शिर्डीत येऊन थाप मारून गेले असे शिंदे म्हणाले. मुळात सोलापुरात हातमागावर जॅकेट चे कापड बनतच नाही असा दावा शिंदे यांनी आपल्या भाषणात केला. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या हि सोलापूर लोकसभा कॉग्रेसने जिंकावी या साठी प्रयत्नशील आहेत. भाजपचा खासदार दारू पितो अशा आशयाचे वादग्रस्त विधान प्रणिती शिंदे यांनी नजीकच्या काळात केले होते.

सिंचन घोटाळा : पाच आरोपी दोषमुक्त, एसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह

जशी भाजपात गटबाजी तशी कॉग्रेसमध्ये हि एकी नाही 
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंचा पराभव होण्याचे एक प्रमुख कारण सांगितले जाते ते म्हणजे सोलापूरातील भाजपमध्ये असलेली उघड गटबाजी सत्तेपासून अतृप्त र्होईवलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांनीच शिंदेंना पराभवाच्या गर्तेत ढकलले असे अनुमान राजकीय वर्तुळात २०१४ साली बांधण्यात आहे आहेत. त्या गटबाजीत गेल्या साडेचार वर्षात कोणतीही सुधारणा झाली नाही असे जाणकार सांगतात. येणाऱ्या काळात कॉग्रेसचे ते नेते सुशीलकुमारांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहतील या बद्दल प्रश्नवाचक चिन्ह आहे. भाजप या मतदार संघात उमेदवार म्हणून कोणता चेहरा देते यावर येणाऱ्या काळात निकालाचा अंदाज व्यक्त होऊ शकतो तूर्तास शिंदे लीड घेत असल्याचे चित्र मतदारसंघात बघण्यास मिळते आहे.