सुशिलकुमार शिंदेंना कार्यकारिणीतून वगळ्याच्या निषेधार्थ, सोलापूरात युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राडा  

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काॅंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना काॅंग्रेस कार्यकारिणीत स्थान न दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी सोलापूरातील काॅंग्रेसभवनाची तोडफोड केली आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40aa3020-8b5b-11e8-bbdf-23dde9b62bce’]

काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. त्यामधून सुशीलकुमार शिंदे यांच्यासह देशातील काही दिग्गज नेत्यांना वगळण्यात आलं आहे. पक्षाच्या या भूमिकेवर नाराज होत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. मात्र निदर्शनाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

यावेळी युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस भवनात प्रचंड  घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सुशीलकुमार शिंदे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सन्मानाने घेण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. एवढेच नाही तर शिंदेना कार्यकारिणीतून वगळल्याच्या निषेधार्थ युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देखील दिले आहेत.
[amazon_link asins=’B0756Z53JP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4628bdcf-8b5b-11e8-9430-356b330fbd2d’]

नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील 5 जणांना संधीः
काॅंग्रेसने जाहिर केलेल्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील 5 जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश आहे.