Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

मुंबई : Sushma Andhare | वर्धा चे खासदार आणि भाजपा उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सूनबाई पूजा तडस यांनी सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन तडस पिता-पुत्रावर गंभीर आरोप केले होते. यावेळी पूजा तडस या छोट्या मुलाला घेऊन आल्या होत्या. माझे आणि मुलाचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे झाले आहेत, असेही यावेळी पूजा यांनी म्हटले होते. मात्र, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला या पत्रकार परिषदेत छोट्या मुलाला आणल्याची गोष्ट खटकली आहे.

या पत्रकार परिषदेत पूजा तडस त्यांच्या १७ महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत घेऊन आल्या होत्या. मुलाचा प्रचारासाठी वापर केला असे म्हणत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना सुशीबेन शहा यांनी पत्र लिहिले आहे.

सुशीबेन शहा म्हणाल्या, कविता, गाणी, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्ष/उमेदवार यांच्या चिन्हाचे प्रदर्शन, राजकीय पक्षाच्या विचारसरणीचे प्रदर्शन, एखाद्या पक्षाच्या यशाचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे राजकीय मोहिमेचे स्वरुप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करण्यापर्यंत विस्तारित आहे. यात विरोधी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर टीका करण्यासाठीही मुलांचा वापर होऊ शकत नाही; असे निर्देश निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत दिले आहेत.

सुशीबेन शहा यांनी म्हटले की, सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | इतिहासाची मोडतोड करून पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करणार्‍या भाजप नेतृत्वाने चीन गिळंकृत करत असलेले ‘भोलेनाथा’चे कैलास वाचवावे