Sushma Andhare – Devendra Fadnavis | संघाचा फडणवीसांविरोधात नाराजीचा सूर; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट, म्हणाल्या – ‘पंकजा यांना बळ…’

पुणे : Sushma Andhare – Devendra Fadnavis | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंधारे यांनी म्हटले की, राज्यात आगामी निवडणूका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतल्यास भाजपला फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना केंद्रात पाठवा, अशी नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत (RSS Meeting) व्यक्त करण्यात आली आहे. (Sushma Andhare – Devendra Fadnavis)

अंधारे यांनी यासंदर्भात आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे यांच्या यात्रेला भाजपच्या वरिष्ठांकडूनच अप्रत्यक्षपणे बळ देऊन फडणवीस यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. (Sushma Andhare – Devendra Fadnavis)

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, महिला शहराध्यक्षा पल्लवी सातपुते-जावळे, महेश मोगरे व निषाद पाटील उपस्थित होते.

ईडीला हे प्रकरण आता आठवणार नाही

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याच्या सत्तेत सहभागी झालेले छगन भुजबळ यांचे ईडीकडे जुने प्रकरण आहे. मात्र ईडीला हे प्रकरण आता आठवणार नाही. आता भाजपच्या स्वायत्त संस्था लगेच क्लीन चीट देत आहेत.

तानाजी सावंतांचा घोटाळा बाहेर काढणार

राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा, महाआरोग्य शिबिरे यामध्ये मोठा गोंधळ आहे. आरोग्य विभागातील घोटाळा लवकरच उघडकीस आणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पितळ उघड करणार आहोत, असा दावा अंधारे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या,
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना एकही कार्यकर्ता तयार करता आला नाही.
त्यांनी सेनेची एक शाखाही उघडली नाही. तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांना ४ वेळा महत्त्वाची पदे दिली.
त्यानंतरही त्या शिंदे गटात गेल्या. आता त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi Networth | पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? जाणून घ्या