Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare | शिवसेनेची सध्या राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेत सुषमा अंधारे भाजप आणि शिंदे गटावर टीकेचा भडीमार करत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटदेखील त्यांच्या यात्रेवर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेवर बोलताना अंधारे म्हणाल्या, मी माझे काम आणि महाप्रबोधन यात्रा सुरू राहील. तुम्हाला माझी भरचौकात हत्या करायची आहे का, करा. पण तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. (Sushma Andhare)

 

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केले होते. त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालावरदेखील भाष्य केले होते. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे उद्योग भेट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खूश करण्यासाठी उपयोगी पडले असतील, तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. माझी एक पद्धत आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनी चर्चेतून प्रश्न विचारला. राऊतांनंतर आता सुषमा अंधारेंचा नंबर आहे, अशी चर्चा आहे.

त्यावर, कशासाठी नंबर असेल माझा, माझ्यासाठी ईडी लावता येत नसेल,
तर मग माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जाणार आहेत का, काय केले जाणार आहे माझे?
माझा तुम्ही घातपात घडवून आणणार आहात का? तुम्हाला जे करायचे आहे ते करा.
माझी तुम्ही भरचौकात हत्या करणार आहात का? असेही सुषमा अंधारे यांनी विचारले. (Sushma Andhare)

 

Web Title :- Sushma Andhare | do you want to kill me in chowk or road sushma andharens direct warning to bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs BAN Test Series | पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

India Australia Women T20 Series | भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून; कोण करणार विजयी सुरुवात?

Radhakrishna Vikhe-Patil | 3 हजार 110 तलाठी पदांची भरती प्रक्रिया लवकरच – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील