Sushma Andhare | ‘वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावला जाईल’ – सुषमा अंधारे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेट घेत आहे. कर्नाटकातील बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोकांचा महासागर लोटला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने आजचा (दि. 06 डिसेंबर) दिवस कोणताही प्रतिकार मुंबईत केला नाही. पण त्यामुळे विरोधी पक्ष शांत आहे, असे नाही. विरोधी पक्षाकडून कर्नाटकच्या या मुजोरीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाष्य केले आहे. वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावला जाईल, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

 

कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून जे काही झाले, ते चुकीचे झाले. राज्यातील शिंदे सरकार यावर काही बोलत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकची झुंज लावण्याचे काम भाजप करत आहे. हे सर्वकाही ठरवून सुरू आहे. महाराष्ट्राला राजकीय अस्थिर करून बेरोजगार आणि उद्योग महाराष्ट्राबाहेर पाठविण्यासाठी हे सर्व सुरू आहे. दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यांना जाब विचारला पाहिजे. वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावात जाईल, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

 

यावेळी त्यांनी भाजपच्या मंत्र्यांचादेखील समाचार घेतला आहे.
एकीकडे माझी भीती नाही म्हणतात आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री माझ्यावर रोज बोलतात.
ते माझ्या विरोधात कितीही काहीही बोलले तरी मला अडवू शकत नाहीत.
17 डिसेंबरला आम्ही विराट मोर्चा काढत आहोत. त्यावेळी यांची अरेरावी चालू देणार नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

 

Web Title :- Sushma Andhare | if time permits every shiv sena leader will go to belgaum sushma andhare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे