Sushma Andhare On Vijay Shivtare | विजय शिवतारेंवर सुषमा अंधारेंची खोचक टीका, ”ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक, कारण…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare On Vijay Shivtare | तारे आता जमीन पर उतरले आहेत. ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक. कारण शिवसैनिक दहा वेळा शब्द बदलत नाही किंवा दहा वेळा पक्ष बदलत नाही, अशी खोचक टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये आधी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आणि नंतर माघार घेतली. यावरून अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना समोरासमोर उभा करून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. कुटुंबात भाजपने फूट पाडली. लोकांनी अन्याय विरोधाची मशाल हातात घेतली आहे त्यामुळे विजयाची तुतारी नक्की वाजेल,

भाजपा नेते, खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, उन्मेश पाटलांचे माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहे.

वंचितबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, वंचितने आमच्यासोबत यावे,
असे आम्हाला खूप आधीपासून वाटत होते आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. जर आम्ही प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान केला नाही. तर मला भाजपच्या लोकांना विचारायचा आहे की अजितदादांचा पाच जागा देऊन काय सन्मान केला? असा सवाल अंधारे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)