ADV

Sushma Andhare-Rupali Thombare Patil | “अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची…” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sushma Andhare-Rupali Thombare Patil | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर पक्षांमध्ये विरोधकांचे आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.(Sushma Andhare-Rupali Thombare Patil)

दरम्यान पुण्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) असलेल्या रुपाली ठोंबरेंबाबत केलेल्या भाष्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे यांचा फोटोदेखील आहे. यासह अंधारे यांनी म्हटलं आहे की “निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरिही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…”

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे रुपाली ठोंबरे यांना अजित पवार गट सोडून ठाकरे
गटात येण्याची साद घातल्याची चर्चा रंगू लागली आहे.आगामी काळात विधानसभा निवडणूका
(Maharashtra Assembly Election) होऊ घातल्या आहेत. दरम्यान रुपाली ठोंबरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी