Sushma Andhare | ‘लढाई दोन वाघांची आहे ना; मग कुत्रे का फायदा घेत आहेत?’ – सुषमा अंधारे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. गुरुवारी मुलुंड येथे महाप्रबोधन यात्रेची सभा झाली, यावेळी सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लावला आहे. लढाई दोन वाघांमध्ये आहे; पण कुत्रे त्याचा फायदा घेत आहेत, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

याप्रसंगी सुषमा अंधारे यांनी दोन वाघांची गोष्ट सांगितली. अंधारे म्हणाल्या, एका जंगलात दोन वाघ होते ते शहाणे होते. या दोघांची प्रचंड मैत्री होती. लहानपणापासून ते एकत्र वाढले, खेळले, बसले होते. सर्व गोष्टीत त्यांनी एकमेकाला साथ दिली. कालांतराने दोघांमध्ये वितुष्ट आले. भांडण झाले. अ वाघ आणि ब वाघ समजून घ्या. एके दिवशी भांडण झाल्यावर ब वाघाने त्याच्या मुलाला सांगितले. अ वाघ वाईट आहे. तो असे करतो, तसे करतो. एकदा ब वाघ मुलाला शिकार शिकवायला गेला. तेव्हा ब वाघाला आणि त्याच्या मुलाला अ वाघ रस्त्यात बसलेला दिसला. ब खूश झाला. अ वाघ आजारी झाला होता. त्यावेळी कुत्र्यांचा घोळका तिथे येत होता. तेव्हा ब वाघाने कशाचाही विचार न करता कुत्र्यांवर झेप घेतली.

मग ब वाघाचा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही अ चा एवढा राग करता, आज चांगली संधी चालून आली होती. त्यामुळे त्यांनी त्याला मारले असते. तुम्ही का मध्ये पडलात? ब शहाणा वाघ होता. तो नकलाकार नव्हता.
ब म्हणाला काहीही झाले तरी लढाई दोन वाघांमध्ये आहे, त्यात कुत्र्यांचा फायदा व्हायला नको.
पण, हे कळायला शहाणपण लागते, असे सुषमा अंधारे यांनी सभेत सांगितले.
त्यानंतर एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या गोष्टीत अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लावला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे असा संघर्ष राज्यात सुरू झाला आहे.
यामुळे शिवसेनेला पुन्हा नव्याने पक्षबांधणी करावी लागत आहे.

Web Title :- Sushma Andhare | shiv sena sushma andhare criticizes mns raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला दाखविणार होता ‘ते’ फोटो

Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

Crime News | ज्वेलरी शाॅपमध्ये चोरट्यांचा गोळीबार; सोने आणि रोख रक्कम हिसकावून पसार