Sushma Andhare | जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं, सुषमा अंधारेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

सुषमा अंधारे नजरकैद तर सभा घेण्याचा पवित्रा कायम

 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची सभा होती. तर याचठिकाणी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची सभा होती. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करत या दोन्ही सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपण सभा घेणारच असा पवित्रा घेतला आहे. यानंतर आता हे प्रकरण तापताना दिसत आहे.

 

सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) आक्रमक झाल्या आहेत. मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. माझ्या कारच्या पुढे 500 पोलिसांचा गराडा आहे. पोलीस मला काय जीवे तर मारणार नाहीत ना असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे सरकार (Shinde Government) आणि जळगाव जिल्हा प्रशासनावर हल्लाबोल केला.

 

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे या सभा घेण्यावर ठाम आहेत.
त्यामुळे त्यांना आता नजर कैद करण्यात आले आहे.
पोलिसांनी अंधारे यांना हॉटेल के पी प्राईडमध्ये (Hotel KP Pride) नजरकैद केले आहे.
मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेणारच असा
पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने जळगाव वरुन मुक्ताईनगरकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैद केले.
साध्या वेशातील पोलीस आणि महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा हॉटेल बाहेर तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title :- Sushma Andhare | shivsena deputy leader sushma andhare criticized the state government after the meeting in jalgaon was denied permission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक