Sushma Andhare | सुषमा अंधारेंच्या स्वतः बद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उभय पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये काही महिन्यांपूर्वी सामिल झालेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या भाजप आणि शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल करत आहेत. अगदी कमी कालावधीत त्यांनी आपल्या भाषणशैलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असतानाच त्यांनी नुकतेच त्यांच्या जीवाविषयी केलेले विधान चर्चेत आले आहे. (Sushma Andhare)

चंद्रपूर येथे आयोजीत एका सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) आपला अपघात घडवून आणला जाऊ शकतो असे विधान केले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले. आपल्या भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. मला वाटतं की माणसं जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे.’ असे या सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या.

दरम्यान, मध्यंतरी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुषमा अंधारे (Sushma Andhare) चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. त्यांच्या या विधानावर वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचे पहायला मिळाले होते.
त्यानंतर त्यांनी संबंध वारकरी संप्रदायाची माफी देखील मागितली होती.
सुषमा अंधारेंच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाकडून आळंदीत आंदोलन करण्यात आले होते. त्यात सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती.
त्यांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागताना सुषमा अंधारे (Sushma Andhare)
म्हणाल्या होत्या की, ‘भागवत संप्रदायातील संत परंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे.
पण, मी एकाही राजकीय पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही. कारण ती माझी स्टाईल आहे.
तरीसुध्दा नकळत माझ्या बोलण्याने जर वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील,
तर क्षमा मागण्यासाठी मला काही गैर वाटणार नाही.’ असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

Web Title :- Sushma Andhare | shivsena leader sushma andhare claims opposition could kill me by accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर

Solapur ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या माजी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याला सक्त मजुरीची शिक्षा

Ajit Pawar | ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम, तुम्हाला वाटत असेल तर गुन्हा दाखल करा, पण…’, अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर