Sushma Andhare | योग्य वेळी राजकीय मंचावरुन मी उत्तर देईल…” विभक्त पतीच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन – आज ठाणे येते होणाऱ्या कार्यक्रमात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये (CM Eknath Shinde Group) दोन नवीन प्रवेश होणार आहेत. ते म्हणजे दीपाली सय्यद (Deepali Sayyad) आणि वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar). एकीकडे दीपाली सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपच्या (BJP) महिला आघाडीने विरोध दर्शविला असताना वैजनाथ वाघमारे अडसरकार यांची ही एक वेगळी गोष्ट आहे. ते उद्धव ठाकरे गटातील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती आहेत. मी लवकरच सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा पर्दाफाश करेन, असे सांगत त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणाही वैजनाथ वाघमारे अडसरकर यांनी केली आहे.

 

या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. राजकारणात अनेक पक्षांमध्ये अनेक जण प्रवेश करतात, कोण कुठले मुद्दे घेऊन अमुक पक्षात जातो, हे महत्त्वाचं आहे असे सांगत मी रडत बसणारी नसून, मी लढणारी आहे. योग्य वेळी योग्य प्रश्नांची उत्तरे राजकीय पटलावर देईल, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

 

“गेली ४ वर्ष आम्ही विभक्त राहतोय. विभक्त पतीच्या मी आरोपावर काहीही बोलणार नाही. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… मी संविधान मानणारी व्यक्ती आहे. त्यांचा तो अधिकार अबाधित ठेऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

स्वतःच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “प्रत्येकाचा भूतकाळ असतो.
जसा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आहे आणि आमच्या खासदार भगिनी भावना गवळींचा (Bhavaba Gavali) आहे…
कुणाचाही भूतकाळ कुरतडून काढण्याची माध्यमांची खरं तर प्राथमिकता नसावी.
या सगळ्या गोष्टींवर बोलणं मला हास्यास्पद वाटतं. कारण मी त्यांच्यापासून वेगळी होऊन चार वर्षांहून अधिक काळ लोटलाय.
जर मी सध्या त्यांना माझे मित्र मानत नसेल तर त्यांना माझे शत्रू तरी का मानावं.
पण जर माझ्यावर आरोपच होणार असतील, तर योग्य वेळी राजकीय मंचावरुन मी उत्तर देईल.”

 

Web Title :- Sushma Andhare | shivsena leader sushma andhare press conference over divorced husband vaijanath waghmare allegation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’