Sushma Andhare | ‘शिंदे गटाचे 20 आमदार भाजपात सामील होतील’

पंढरपुर/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप (BJP) शिंदे गटाला (Shinde Group) संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे 40 पैकी 20 आमदार भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हा भाजपचा ‘ट्रॅप’ असल्याचा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. पंढरपुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

 

भाजप शिंदे गटला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना समजत नाही. शिंदे गटाचे वीस आमदार फोडून भाजपला स्वत: चा पक्ष मोठा करायचा आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदासाठी थेट नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही आव्हान देतील, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली.

 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही नाही.
हे आमच्या एकनाथ भाऊंना कधी समजणार? भाजपच ट्रॅप टाकत आहे, हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात यायला हवं.
भाजपच अडकवत आहे. भाजपच संपवत आहे. फडणवीसांनी जर उद्या एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 40 पैकी 20 आमदारांना फोडून आपल्या पक्षात सामील करुन घेतलं, तर नवल वाटून घेऊ नका.
कारण देवेंद्रजी ‘उस बला का नाम है…’ येणाऱ्या काळात पंतप्रधान पदासाठी मोदींना आव्हान देणारं कुणी असेल तर,
ते देवेंद्र फडणवीस असतील.

 

Web Title :- Sushma Andhare | shivsena sushama andhare on devendra fadnavis trap 20 mla from shinde group will join bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’