Sushma Andhare | ‘आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे…’, सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांची तुरुंगातून जामिनावर (Bail) सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) विरोधकांवर टीका केली जात आहे. विशेषत: शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला. तसेच संजय राऊतांच्या येण्यामुळे ठाकरे गटाची ताकद आणखी वाढली आहे, असेही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले.

 

ईडीची खरंच गरज आहे का?
संजय राऊत यांच्या येण्यामुळे शिवसेनेची ऊर्जा वाढली आहे. ताकद वाढली आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय की ही अटक (Arrest) बेकायदेशीर होती. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची ईडीची (ED) पद्धत आहे. ईडीचा रेट ऑफ कन्विक्शन (Rate of Conviction) अर्ध्या टक्क्याने कमी आहे. त्यामुळे ईडीची खरंच गरज आहे का? यावर सभागृहामधून प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितले.

 

मी सोमय्यांची शष्या व्हायला तयार, पण…
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जे लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी (BKC) मेळाव्यात करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार? मी किरीट सोमय्यांना वारंवार सांगत आहे की मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी तुमच्यावर आरोप करत नाही, टीका करत नाही. उलट मी त्यांचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीटभाऊ, अनिल परबांचं (Anil Parba) रिसॉर्ट फार लांबचा पल्ला आहे. त्याआधी मुंबईत नारायण राणेंच्या (Narayan Rane) अधीश बंगल्यावर (Adhish Bungalow) हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारता, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांतल्या लोकांना हिशोब कधी विचारणार, असा सवाल त्यांनी सोमय्या यांना केला.

आपला तो फेकू आणि…
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातल्या काही नेत्यांचा उल्लेख केला.
भावना गवळी (Bhavna Gawli), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) किंवा यशवंत जाधव (Yashwant Jadhav) या लोकांना सरकार स्थापन करण्याआधी माफिया म्हणून किरीट सोमय्यांचा गळा सुकला होता.
त्यांना क्लीनचिट तर मिळालेली नाही. त्यांच्यावर चार्जशीट कधी दाखल होणार आहे? याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी दिले पाहिजे.
आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद करावं असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

 

Web Title :- Sushma Andhare | shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण