Sushma Andhare Speech | ”हा तर शुभसंकेत, बजरंगबलीचा आशीर्वाद”, सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असताना अचानक आले वानर, पहा काय घडले (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sushma Andhare Speech | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांची काल भिवंडी लोकसभा मतदार संघात सभा झाली. कसारा खर्डी येथे जनसंवाद यात्रा काढून त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर शहापूर येथील सभेत त्या भाषण करत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले आणि अचानक एक वानर आले आणि त्यांच्या समोरच बसले.

अंधारे यांनी वानरासाठी मंचाच्या खाली केळी टाकली पण ते मंचावरच घुटमळत बसले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय झाला आहे.

सुषमा अंधारे यांचे भाषण सुरू असताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर आलेले हे वानर म्हणजे शुभसंकेत असून तो बजरंगबलीचा आशीर्वाद आहे, अशी कमेंट काही यूजर्सने व्हिडिओवर केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

सध्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा शिवसेना ठाकरे गटाने सुरू केली आहे. याच यात्रेत सुषमा अंधारे भाषण करत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, तपास यंत्रणाचा गैरवापर करून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत.

त्या पुढे म्हणाल्या, निवडणूक लागलेली नाही, तरीही मी इथे आहे. कारण जर मी ठामपणे सांगते, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, तर तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करत असलेल्यांच्या विरोधात मी उभी आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. यावेळी कमळावर ठपका मारला तर २०२९ ला ठपका मारण्यासाठी निवडणूक असेल हे विसरून जा.

सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेब नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष
सांभाळण्यात अडचण आली असे काही बदमाश सांगतात. जनतेने हे नीट समजून घ्यावे, जे म्हणतात,
बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली हे वाक्य अधारे यांनी उच्चारताच अचानक एक वानर अंधारे यांच्या समोर
येऊन बसेल. प्रसंगावधान राखून अंधारे यांनी मंचावर असलेली काही केळी वानरासाठी खाली फेकली, पण ते अंधारे
यांच्या समोरून उडी मारून मागच्या बाजूला जाऊन बसले. यावेळी त्यांनी स्वतःला सावरले.

यानंतरही अंधारे यांनी भाषण सुरूच ठेवले. त्या म्हणाल्या, बाळासाहेब हयात नाहीत म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला
असे काहींचे म्हणणे असेल मग शरद पवार हयात असताना शरद पवारांचा पक्ष कसा काय गेला?

त्या म्हणाल्या, जो पक्ष शरद पवारांनी घडवला, वाढवला त्यांचाही पक्ष भाजपा ताब्यात घेते. समान प्रक्रिया वापरली जाते.
या सर्व गोष्टीवरून एकच स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेता नाही. व्हिजन नसलेले नेते फडणवीसांकडे आहेत.

देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना अंधारे म्हणाल्या, पंकजा मुंडे, विनोद तावडेंचे राजकारण ज्यांनी संपवले ते बावनकुळेंचे
राजकारण संपवायलाही मागे पुढे बघणार नाहीत. कारण त्यांनाही समजले आहे की फडणवीस यांनी फक्त महाराष्ट्राचे
नाही भाजपाचेही नुकसान केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना