Sushma Andhare | अब्दुल सत्तारांना शेतीतलं काहीच कळत नाही, सुषमा आंधारे यांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या – ज्यांना कुळव, रुमणं, दांडा कळत नाही त्यांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare | परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले आहे. सध्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी (Farmer) आणि विरोधी पक्ष आकंडतांडव करत असून दिवाळी तोंडावर आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ओल्या दुष्काळाची मागणी करूनही शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती नसल्याचे विधान केल्याने यावर तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा आंधारे (Sushma Andhare) यांनी यावरून सत्तारांना उत्तर दिले आहे. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

 

सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्ही अब्दुल सत्तारांना उगाच त्रास देत आहात. ज्यांना शेतीविषयी काहीच माहिती नाही त्यांना उगाच का त्रास द्यायचा. ज्यांना कुळव, रुमणं, दांडा कळत नाही, ज्यांना पाळी, पेरणी कळत नाही त्यांना काय सांगायचे.

 

अब्दुल सत्तारांनी सोयाबीनचे नुकसान पाहण्यासाठी एकदा आमच्या कोरडवाहू शेतात यावं. कारण ज्यांना हाफकिन म्हणजे काय हे कळत नाही अशी माणसं आरोग्यमंत्री झाली आहेत, असे म्हणत अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East By-Election) उमेदवार मागे घेऊन भाजपा (BJP) वेगळी खेळी खेळत आहे
का, या प्रश्नावर सुषमा आंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, भाजपा राजकारणातील सर्व डाव वापरणार आहे
याचा आम्हाला अंदाज आहे. प्रेम, युद्ध आणि राजकारणात सर्व चालतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत सोज्वळ राजकारणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे.
भाजपा त्यांच्या पद्धतीने राजकारणातील सर्व डाव वापरणार याचा आम्हाला अंदाज आहे.

 

आंधारे पुढे म्हणाल्या की, भाजपा साम, दाम, दंड आणि भेद या सर्व गोष्टींचा वापर करेल.
त्यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला म्हणजे ते प्रमाणिकपणे संवदेनशील संस्कृती जपणारे आहेत या भ्रमात आम्ही अजिबात नाही.
घोडा मैदान लांब नाही. निकाल लवकरच लागेल.

 

Web Title :- Sushma Andhare | sushma andhare comment on bjp politics in andheri east bypoll

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune CP Amitabh Gupta | मोक्का कायद्याची प्रभावी अमंलबजावणीने गुंडाना धाक – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारचा नकार

Maharashtra IPS Officer Transfer | पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अंकित गोयल