Sushma Andhare | चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ सुषमा अंधारे यांनी “या” सदस्यपदाचा दिला राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक समाज सुधारकांनी शाळा सुरू केल्या. त्यावेळी त्यांना तेव्हाच्या सरकारने अनुदाने दिली नाहीत, तर त्यांनी अक्षरक्ष: भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील पैठणमध्ये म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीदेखील त्यांच्या या विधानाची दखल घेतली आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांनाच पत्र पाठवून याबाबत लेखी कळवले आहे. त्यामुळे आता या सगळ्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे पाहावे लागेल.

गेले सहा महिने राज्यात भाजपचे नेते आणि महामहीम राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सातत्याने अपमान केला आहे. त्यामुळे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच राज्यात लागली आहे. मी माझ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. माझे पत्र आपल्या कार्यालयात पाठवत आहे. तसेच हे पत्र समाज माध्यमावर सर्व चळवळीवर प्रेम करणाऱ्या बांधवांसाठी माहितीस्तव देत आहे.

समितीवरील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा, हा त्यांच्या सद्सद्‌विवेकबुद्धीचा भाग आहे.
मात्र, माझ्यासाठी अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या
सदस्यपदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती, ती आता सांभाळू शकत नाही.
ही समिती उच्च व तंत्रशिक्षणाच्या अखत्यारीत येते. याच खात्याच्या मंत्र्याचे डॉ. आंबेडकरांविषयी एवढे हीन
दर्जाचे विचार आहेत, तर त्या समितीवरील सदस्यपदापेक्षा आम्हाला डॉ. बाबासाहेबांचा सन्मान लाख पटीने
मोठा आहे. सबब आपण केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ मी या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे,
असे अंधारे म्हणाल्या आहेत.

Web Title :-  Sushma Andhare | sushma andhare resignation from maharashtra govt committee to oppose chandrkant patil controversial statment about babasaheb ambedkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Ramdas Athawale | सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या; टीका करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले – रामदास आठवले