×
Homeताज्या बातम्याSushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला..., सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ...

Sushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. या सभांमधून सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे गट आणि भाजपचा समाचार घेत आहेत. त्यांच्या त्या टीकांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले होते. ‘आमची नक्कल करुन त्या टाळ्या आणि शिट्या मिळवितात. आमची नावे घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा,’ असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ‘प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे टाळ्या आणि शिट्ट्या मिळवितात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्हाला आमची कामे आहेत.’ चित्रा वाघ यांचा हा टोला सुषमा अंधारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचे खोबरं
उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या (वं).
अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाही..!!” सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना या ट्विट मधून सल्ला देत,
टोला ही लगावला आहे.

 

Web Title :- Sushma Andhare | thackeray group sushma andhare shivsena mocks chitra wagh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप

Must Read
Related News