Sushma Andhare | सुषमा अंधारे विरोधात शिंदे गटाचा नवा ‘डाव’; विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज ठाणे येते होणाऱ्या कार्यक्रमात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये (CM Eknath Shinde Group) दोन नवीन प्रवेश होणार आहेत. ते म्हणजे दीपाली सय्यद (Deepali Sayyad) आणि वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar). एकीकडे दीपाली सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपच्या महिला आघाडीने विरोध दर्शविला असताना वैजनाथ वाघमारे अडसरकार यांची ही एक वेगळी गोष्ट आहे. ते उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती आहेत. ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची (BJP) सुषमा अंधारे (Sushma Andhare) विरोधात खेळी मनाली जात आहे.

 

पत्रचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाच्या प्रभावी प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांचा उदय झाला आणि थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. त्यामुळे सुषमा अंधारे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र यातच शिंदे गटाने वैजनाथ वाघमारे अडसरकर यांना गळाला लावून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी तुरुंगातील सुटून आलेल्या संजय राऊतांची भेट घेतली.
तेव्हा संजय राऊत यांनी सुषमा अंधारेंवर स्तुती सुमने उधळली आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर भक्कमपणे गटाची बाजू मांडल्याबद्दल संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांचे कौतुक केले आहे.
त्यावेळी, मी फक्त खारीचा वाट उचलायचा प्रयत्न केला, आमच्या परीने खिंड लढवली फार काही केलं नाही,
असे सुषमा अंधारे म्हणल्या. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘ही खिंड निकराने लढलात, त्यामुळे ती पावनखिंड झाली.’
अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

 

Web Title :- Sushma Andhare | uddhav thackeray camp leader sushma andhare ex husband vaijnath waghmare adsarkar will join eknath shinde camp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Apurva Nemlekar | ‘त्या’ प्रश्नावर चाहत्याला अपूर्वा नेमळेकरचे सडेतोड उत्तर; नक्की काय म्हणाली अपूर्वा नेमळेकर…

Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले – ‘…तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल’