Sushma Andhare | शिंदे गटाने बच्चू कडू यांचा विश्वासघात केला, त्यांचा फुटबॉल झाला – सुषमा अंधारे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे यांचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) सध्या नाराज आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेणार असल्याचे शिंदे आणि फडणवीसांना सांगितले आहे. त्यावर विरोधी पक्ष देखील भाष्य करत तोंडसूख घेत आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी बच्चू कडूंवर भाष्य केले आहे. बच्चू कडू यांचा फुटबॉल झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि फडणवीसांनी (Devendra Fadnavis) असे वागायला नको होते, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

शिंदे गटाने बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या अश्या वागण्याने बच्चू कडू यांची समाजातील आणि राजकारणातील पत कमी होईल. बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या गटासोबत जाऊन स्वाभिमानाशी तडजोड केली होती. बच्चू कडू यांना खरे तर मंत्रीपद मिळायला हवे होते, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या. आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी सुरु केलेल्या उपोषणस्थळी त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे सरकारवर (Shinde Government) देखील टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुळाचा गणपती करुन ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बजाज अलायन्स (Bajaj Allianz) कंपनीला शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. पण आता कंपनीने हात वर केल्यावर शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.

मागील तीन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विमा (Crop Insurance), अनुदान (Subsidy) आणि नुकसान भरपाईसाठी
(Compensation) त्यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
या आंदोलनस्थळी जाऊन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी
खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासोबत जात कैलास पाटील यांचे औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.

Web Title :- Sushma Andhare | uddhav thackeray camp sushma andhare reaction on bacchu kadu and ravi rana conflict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bad Breath | तोंडातून दुर्गंधी येते का? यापासून सुटका मिळवण्यासाठी करा हे 3 घरगुती उपाय

Fatty Liver | सकाळी उठल्यावर डोळ्यांवर येत असेल सूज, तर असू शकतो फॅटी लिव्हरचा संकेत; जाणून घ्या सविस्तर