Sushma Andhare | येत्या चार दिवसात करणार सुषमा अंधारेंचे विभक्त पती मोठा गौप्यस्फोट

पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डोकेदुखी वाढवल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांना त्यांच्या गटात समाविष्ट करून घेतले आहे. तेव्हा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि त्यांच्यात झालेल्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर आम्ही विभक्त झालो, असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या चार दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

वैजनाथ वाघमारेंनी चार दिवसात पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे सांगणार असल्याचा इशारा देत, ते म्हणाले, “चार दिवस सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे.”

त्याच जागी जेव्हा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना त्यांच्या पतीच्या आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या,
“प्रत्येकाचा भूतकाळ असतो. जसा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आहे आणि आमच्या खासदार भगिनी भावना गवळींचा (Bhavaba Gavali) आहे…
कुणाचाही भूतकाळ कुरतडून काढण्याची माध्यमांची खरं तर प्राथमिकता नसावी.
या सगळ्या गोष्टींवर बोलणं मला हास्यास्पद वाटतं. कारण मी त्यांच्यापासून वेगळी होऊन चार वर्षांहून अधिक काळ लोटलाय.
जर मी सध्या त्यांना माझे मित्र मानत नसेल तर त्यांना माझे शत्रू तरी का मानावं? पण जर माझ्यावर आरोपच होणार असतील, तर योग्य वेळी राजकीय मंचावरुन मी उत्तर देईल.”

 

Web Title :- Sushma Andhare | vaijnath waghmare tell why he and sushma andhare get divorced from marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?