Sushma Andhare | सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीने सांगितले घटस्फोटाचे कारण; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डोकेदुखी वाढवल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांना त्यांच्या गटात समाविष्ट करून घेतले आहे. तेव्हा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि त्यांच्यात झालेल्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर आम्ही विभक्त झालो, असे त्यांनी सांगितले.

 

वाघमारे म्हणाले, “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. म्हणून आम्ही वेगळे झालो, सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यांचे विचार वेगळे होते आणि माझे विचार वेगळे राहिले. तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही.”

 

पुढे अंधारेंच्या राजकीय महत्वकांक्षेला स्पर्श करत वैजनाथ वाघमारे म्हणाले, “सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या.
मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं.
पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही.
तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही.”

 

Web Title :- Sushma Andhare | vaijnath waghmare tell why he and sushma andhare get divorced from marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?