Sushma Andhare | वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र – सुषमा अंधारे

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची शिवसेना पक्षातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली होती. विश्व वारकरी सेनेचे (Vishwa Varkari Sena) अध्यक्ष गणेश महाराज शेटे (Ganesh Maharaj Shete) यांनी पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनाऱ्यावर शपथ घेत, सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तसेच मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे (Sushma Andhare) राहतील त्या पक्षाला मी मत देणार नाही, असे देखील शेटे म्हणाले होते. त्यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असे अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा (Anti-Superstition Act) आहे. मी कोणाच्याही श्रद्धेच्या आणि भावनेच्या आड नाही. माझी अंतयात्रा काढली गेली. त्याने मला काही फरक पडत नाही. इतिहासात अनेक समाजसुधारकांच्या अंतयात्रा काढल्या गेल्या. त्यामुळे त्यांनी माझी दखल घेतल्याने मी त्यांची आभारी आहे. जे लोक माझ्यावर भूंकत आहेत, त्यांच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

 

 

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, कोवीड काळात सर्व मंदिरे बंद होती.
त्यावेळी शेटे उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी सांगत होते. कोवीडमुळे वारी बंद असताना यांनी रान पेटवले होते.
ते कधीच वारीत पायी चालले नाहीत.
कोवीड काळात लोकांच्या आरोग्याचा विचार न करता भाजपने केवळ राजकीय नाटके केली.
त्यात शेटे आणि मंडळी देखील होती. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी विश्व वारकरी सेनेचा वापर भाजप (BJP) करत आहे. त्यांना तो करू द्या. ही भाजपचीच आघाडी आहे. ते आम्हाला कधीच मत देत नव्हते आणि यापुढे देखील देणार नाहीत.

माझ्या भाषणातील केवळ चौदा सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल केला गेला. त्यातील पूर्ण भाषण दाखविले नाही.
मी म्हणाले होते, ‘दादाहो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले. मग आमच्या गोरगरीब मुलांनी ज्ञानापासून वंचित राहावे,
असे कुठल्या धर्माला वाटते?’ धर्म आणि सामान्य माणसातील एजंटांनी हे षडयंत्र केले आहे.

कालच्या विराट मोर्चावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही बातमी आली आहे.
हा सर्व मला शांत करण्याचा प्रयत्न आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरते, मी त्यांची कोंडी करते,
त्यामुळे हे प्रकार केले जात आहेत, असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.

Web Title :-  Sushma Andhare | warkari should not enter politics conspiracy to tarnish my image sushma andhare clarification on controversial statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बोपदेव घाटातील तरुणाच्या खूनाचा उलगडा, मित्रांकडून चुकून गोळी उडाल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

Vedamurthy Pandav | ‘2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि उद्धव ठाकरे…’ – वेदमूर्ती पांडव यांची भविष्यवाणी