Sushma Sanjay Chordiya | शैक्षणिक, महिला व बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुषमा चोरडिया यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र-2023’ पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Sanjay Chordiya | शैक्षणिक, तसेच महिला सक्षमीकरण व बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन (Suryadatta Education Foundation) व सूर्यदत्त वूमन इंटरप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या (Suryadutt Women Entrepreneurship and Leadership Academy) उपाध्यक्षा सुषमा चोरडिया (Sushma Sanjay Chordiya) यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र-२०२३’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हस्ते सुषमा चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले.

एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीने ‘एसएमई समिट’ व ‘एसएमई एक्सलेन्स अवॉर्ड’ सोहळा नुकताच राजभवन मुंबई येथे आयोजिला होता. यावेळी एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Prof. Dr. Sanjay Chordiya) आदी उपस्थित होते. या समिटमध्ये विविध प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग होता. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षणतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

सुषमा चोरडिया यांना शिक्षण क्षेत्रातील योगदान, महिला व बालकल्याण क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांशी कनेक्ट होत नव्या पिढीला आवश्यक उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. कौशल्यप्रदान व उद्योगांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करण्याचा त्यांचा आग्रह असतो. मूल्यवर्धित व संस्कारक्षम शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. (Sushma Sanjay Chordiya)

प्रख्यात परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या चोरडिया समाजाच्या भल्यासाठी आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट अंतर्गत विविध स्वयंसेवी कौशल्य आधारित प्रकल्प, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, पात्र, आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला मोफत शिक्षण देण्यात येते. पुणे येथील हमाल, रिक्षाचालक अशांना इंग्रजीचे ज्ञान देण्याबद्दल त्या सर्वाना परिचित आहेत.

Advt.

सूर्यदत्त ग्रुपने सुरू केलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
गावातील महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप, मुलांना मोफत कपडे आणि सकस आहाराचे वाटप,
आरोग्य तपासणी शिबिरे आदी उपक्रमांचा समावेश आहे.
श्रीमती चोरडिया सूर्यदत्त ग्रुपचा मातृ चेहरा असून, ‘सूर्यदत्त’मधील महिला शिक्षक सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी त्या एक आदर्श नेतृत्व आहेत.

Web Title :- Sushma Sanjay Chordiya | ‘Pride of Maharashtra-2023’ awarded
to Sushma Chordia for her remarkable work in the field of education,
women and child welfare

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Higher and Technical Education Minister Chandrakant Patil |
तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Suryadatta Group of Institutes | खादी भारतीय संस्कृती, परंपरेची ओळख अन् शांतीचे प्रतीक ! सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे खादी संकल्पनेवरील ११ वे ‘स्पार्क २०२३’ वार्षिक प्रदर्शन