‘माझ्या बिचाऱ्या सासू-सासऱ्यांना मदत करा’: ‘त्या’ मजेशीर ट्विटला सुषमा स्वराज यांचं मजेशीर उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या परदेशात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणींचा सामना करत असलेल्या अनेक भारतीयांना ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा मदत करत आल्या आहेत. अशातच सुषमा स्वराज यांनी एका तरुण भारतीय मुलीच्या बिचाऱ्या सासरच्यांना मदत केली आहे. त्यांचा हा किस्सा मजेशीर असून तो सोशलवर गाजताना दिसत असून चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या सासू-सासऱ्यांना व्हिसासाठी अडचण येत असल्याचे सांगत सुषमा स्वराज यांना ट्विटरवर टॅग केले आहे. परंतु तिने हे ट्विट मजेशीर पद्धतीने लिहिले आहे. तिला सुषमा स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. दरम्यान आपल्या ट्विटमध्ये ती तरुणी म्हणते की, “बिचारे माझे सासरवाडीवाले, म्हणजेच माझी सासू आणि सासरे यांना अनेकदा लग्न समारंभाना व्हिसा अडकून पडल्याने येता आले नाही. त्यांना अनेकदा लग्न पुढे ढकलावे लागले आहे. माझे लग्न त्यांच्या मुलाशी होणार असून तो त्यांचा एकूलता एक मुलगा आहे. त्यांना या लग्न समारंभात सहभागी व्हायचे आहे. प्लिज मदत करा.”

या मुलीचे लग्न भारतात होणार असून तिच्या सासू-सासऱ्यांसोबतच तिचा भारतीय व्हिसाही व्हेरीफिकेशनमुळे अडकून पडला आहे. जर व्हिसाचे काम झाले नाही तर सासू सासरे आणि तिला स्वत:लाही तिच्याच लग्नाला येता येणार नाही. शिवाय व्हेरिफिकेशन होऊनही सासू-सासऱ्यांना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे ते त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी भारतात येतील किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाल्याने या तरुणीने थेच स्वराज यांना टॅग करत ट्विट केले आहे आणि व्हिसासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. शिवाय आणखी एक गमतीशीर बाब अशी की, सासू सासऱ्यांना व्हिसा न मिळाल्यांने त्यांना (बिचारे सासू-सासरे) लग्न पुढे ढकलावे लागले आहे असेच मजेदार वाक्य नकळत ती बोलून गेली आहे.

दरम्यान तरुणीच्या त्या ट्विटला स्वराज यांनीही मजेदार पद्धतीने उत्तर दिले आहे. मी मदत करू शकते असेही स्वराज यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये स्वराज म्हणतात की, “ओह… व्हिसा मिळवण्यासाठी मी तुझ्या सासरच्यांना मदत करू शकते. त्यामुळे त्यांना (सासू-सासरे) लग्न पुढे ढकलावे लागणार नाही.”

सुषमा स्वराज यांनी दिलेल्या या मजेशीर उत्तराने याची सोशलवर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान सुषमा स्वराज यांनी एखाद्याला ट्विट करत मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मजेशीर पद्धतीने एखाद्या ट्विटला उत्तर देणे हेदेखील स्वराज यांच्यासाठी नवीन नाही. त्यांनी फ्रीजसंदर्भात तक्रार करणाऱ्या एका व्यक्तीलाही स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिले होते. स्वराज यांचे हे ट्विटही चांगलेच चर्चेत येताना दिसले होते.