सुषमा स्वराज अनंतात ‘विलीन’, मुलगी बांसुरीनं दिला ‘मुखाग्नी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर आज अंत्यसंस्कारासाठी सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयाच्या लोधी रोड स्थित स्मशानभूमीत नेण्यात आले. राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल आणि जेपी नड्डा यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला खांदा दिला. प्रसंगी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते.

सुषमा स्वराज यांच्या मुलीने म्हणजेच बासुरीने सुषमा स्वराज यांना मुखाग्नी दिला. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांची अंत्यसंस्कार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

याआधी सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी राष्ट्रपती कोविंद, उपराष्ट्रपती वैकेया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह देशभरातील उपस्थित इतर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. ट्विटरवरुन देखील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सुषमा स्वराज यांना शासकीय मानवंदना देखील देण्यात आली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. संपूर्ण देशात सध्या दुखद वातावरण आहे.

आरोग्यविषयक वृत्त –