सुषमा स्वराज यांच्या निधनामुळं ‘बॉलिवूड’ देखील ‘दु:खात’, अमिताभ बच्चन – लता मंगेशकरांसह इतरजणही ‘भावूक’, वाहिली ‘श्रद्धांजली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि धाडसी राजकारणी म्हणून त्या परिचित होत्या. सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पुर्णवेळ परराष्ट्र मंत्री राहिल्या. काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय नम्र आणि सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये लोकप्रिय असलेला हा चेहरा भारतातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील.

६७ वर्षीय सुषमा स्वराज यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध क्षेत्रातील लोकांनी आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.

अमिताभ यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहत लिहिले कि, एक अत्यंत दुःखद घटना, प्रबळ राजकीय नेत्या, अद्भूत प्रवक्त्या, देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले कि, सुषमा स्वराज यांच्या निधनाने मोठा झटका बसला आहे. प्रभावशाली आणि इमानदार नेत्याला आज आपण मुकलो. त्यांना संगीताची आणि कवितांची फार आवड होती. पूर्व विदेश मंत्री आपल्या कायम स्मरणात राहतील.

रितेश देशमुख याने देखील त्यांना श्रद्धांजली वाहतात लिहिली कि, एक उत्कृष्ट संचालक, एक देशभक्त नेता सुषमा स्वराज आज आपल्यात नाहीत. विदेशमंत्री असताना त्या नेहमीच भारतीयांच्या सेवेसाठी तत्पर असायच्या. त्यांच्या कुटुंबियांना देव इच्छाशक्ती देवो अशी देवाकडे प्रार्थना.

दरम्यान, या मान्यवरांसह अनेक मान्यवर आणि बॉलिवूडमधील लोकांनी देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये शबाना आझमी, सनी देओल, अनुष्का शर्मा, आयुष्यमान खुराणा आणि स्वरा भास्कर यांसारख्या बॉलिवूडमधल्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –