सुषमा स्वराज यांची ‘शेवटची इच्छा’ बांसुरीनं केली ‘पूर्ण’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी आपल्या आईची शेवटची इच्छा शुक्रवारी पूर्ण केली.

सुषमा स्वराज या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशी बोलणे झाले होते. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे प्रतिनिधीत्व करताना साळवे यांनी आपली एक रुपया फी घेणार होते. ही केस भारताने जिंकली. तरी, अ‍ॅड. साळवे यांना त्यांची एक रुपया फी देण्याचे राहून गेले होते. आपण ही फी घेण्यासाठी यावे, अशी इच्छा सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली होती. हे बोलणे संपल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाले होते. त्यांची ही इच्छा अपुरी राहिली होती. त्यांची इच्छा मुलगी बांसुरी स्वराज हिने पूर्ण केली.

https://twitter.com/governorswaraj/status/1177605870378602501

याबाबत मिझोरामचे राज्यपाल स्वराज कौशल यांनी ट्विट करुन सांगितले की, आमची मुलगी बांसुरी स्वराज हिने अ‍ॅड. हरीश साळवे यांची शुक्रवारी भेट घेतली आणि त्यांना एक रुपया भेट देऊन सुषमा स्वराज यांनी इच्छा पूर्ण केली.