‘तुम्ही तर राहुल गांधींहून सरस’ अशी तुलना करणाऱ्याला सुषमा स्वराज यांचे उत्तर, म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या सासू-सासऱ्यांना व्हिसासाठी अडचण येत असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर टॅग केले आहे. परंतु तिने हे ट्विट मजेशीर पद्धतीने लिहिले आहे. तिला सुषमा स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. यानंतर या प्रसंगाची सोशलवर चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले. काहींनी त्यांच्या उत्तराचे कौतुक केले. अशातच एका युजरने त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत केली. यानंतर सुषमा स्वराज यांनीही त्याला खास अंदाजात उत्तर देत टोला लगावला आहे.

दरम्यान एका युजरने सुषमा स्वराज यांना तुम्ही तर राहुल गांधींपेक्षाही विनोदी आहात असे म्हणत त्यांची तुलना राहुल गांधींसोबत केली. ट्विट करत त्याने सुषमा स्वराज यांना टॅग केले आहे.

https://twitter.com/trolling_daddy/status/1113274279645171717

त्याच्या या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी त्यांच्या खास अंदाजात त्याला उत्तर देत त्याचा समाचार घेतला. तुम्ही तर राहुल गांधींपेक्षाही विनोदी आहात या ट्विटला सुषमा स्वराज यांनी कोट केले आणि त्याला उत्तर देत आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मग मी विनोद करणं थांबवलं पाहिजे.”

अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या सासू-सासऱ्यांना व्हिसासाठी अडचण येत असल्याचे सांगत सुषमा स्वराज यांना ट्विटरवर टॅग केले आहे. परंतु तिने हे ट्विट मजेशीर पद्धतीने लिहिले आहे. तिला सुषमा स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. दरम्यान आपल्या ट्विटमध्ये ती तरुणी म्हणते की, “बिचारे माझे सासरवाडीवाले, म्हणजेच माझी सासू आणि सासरे यांना अनेकदा लग्न समारंभाना व्हिसा अडकून पडल्याने येता आले नाही. त्यांना अनेकदा लग्न पुढे ढकलावे लागले आहे. माझे लग्न त्यांच्या मुलाशी होणार असून तो त्यांचा एकूलता एक मुलगा आहे. त्यांना या लग्न समारंभात सहभागी व्हायचे आहे. प्लिज मदत करा.”

गमतीशीर बाब अशी की, सासू सासऱ्यांना व्हिसा न मिळाल्यांने त्यांना(बिचारे सासू-सासरे) लग्न पुढे ढकलावे लागले आहे असेच मजेदार वाक्य नकळत ती बोलून गेली आहे.

दरम्यान तरुणीच्या त्या ट्विटला स्वराज यांनीही मजेदार पद्धतीने उत्तर दिले आहे. मी मदत करू शकते असेही स्वराज यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये स्वराज म्हणतात की, “ओह… व्हिसा मिळवण्यासाठी मी तुझ्या सासरच्यांना मदत करू शकते. त्यामुळे त्यांना(सासू-सासरे) लग्न पुढे ढकलावे लागणार नाही.”

सुषमा स्वराज यांनी दिलेल्या या मजेशीर उत्तराने याची सोशलवर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान सुषमा स्वराज यांनी एखाद्याला ट्विट करत मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मजेशीर पद्धतीने एखाद्या ट्विटला उत्तर देणे हेदेखील स्वराज यांच्यासाठी नवीन नाही. त्यांनी फ्रीजसंदर्भात तक्रार करणाऱ्या एका व्यक्तीलाही स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिले होते. स्वराज यांचे हे ट्विटही चांगलेच चर्चेत येताना दिसले होते.