सुषमा स्वराज यांच्यावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता लोधी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी माहिती दिली.

स्वराज यांचे पार्थिव सध्या त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. तेथेच सकाळी ११ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव भाजपाच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील अनेक नेत्यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे.
स्वराज या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी मंत्रिपद घेण्यासही नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय हे त्यांनी स्वप्न पाहिले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी ते पूर्ण केले.

आज लाखो देशवासियांना सहज सुलभ पासपोर्ट तोही अत्यंत कमी वेळात मिळण्यासाठी जी व्यवस्था देशभरात निर्माण झाली आहे, त्यामागे सुषमा स्वराज यांचे काम महत्वाचे ठरले आहे. मंत्री म्हणून देशवासियांसाठी त्यांची ही खूप मोठी उपलब्धी ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –