सुष्मिताकडे नव्हते ‘गाऊन’ घेण्यासाठी पैसे, ‘मिस इंडिया’ जिंकण्यासाठी मोजे आणि पडद्यांपासून तयार केला होता ड्रेस, जाणूघ्या घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –सर्वात प्रतिष्ठीत ब्युटी पेजेंटचा ताज परिधान करणाऱ्या अभिनेत्री सुष्मिता सेन हिची अशी कहाणी समोर आली आहे जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सध्या तिची ही स्टोरी खूप व्हायरल होत आहे. तिनं सिद्ध केलं की, आवड असेल तर काहीही शक्य आहे. ही स्टोरी तेव्हाची आहे जेव्हा सुष्मिता सेन मिस इंडिया स्पर्धेसाठी सिलेक्ट झाली होती परंतु गाऊन बनवण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.

मध्यम वर्गातून येणारी सुष्मिता एका मुलाखतीत बोलताना म्हणाली होती की, जेव्हा तिची निवड मिस इंडियासाठी झाली होती तेव्हा ती ब्रँडेड कपेड अफोर्ड करू शकत नव्हती. यासाठी दोन गाऊन असणं खूप गरजेचं होतं. परंतु तिच्या आईनं तिला हिंमत हारू दिली नाही. तिच्या आईनं पडदे आणि मोज्यांपासून तिला ड्रेस तयार करून आणला होता.

सुष्मितानं सांगितलं की, दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमधून तिनं पडद्याचं कापड खरेदी केलं होतं. टेलर ड्रेस शिवणारा नव्हता परंतु तिच्या तिथेच राहणारा होता. त्यानं तिच्यासाठी छानसा ड्रेस बनवून दिला. याचं डिझाईन कसं करावं यासाठी सुष्मिताची आई शुभ्रा सेन हिनं एका मॅगेझिनची मदत घेतली.

सुष्मिताचे हातमोजे तर खूपच युनिक पद्धतीनं तयार करण्यात आले होते. तिनं सांगितलं की, हातमोज बनवण्यासाठी तिनं बाजारातून मोजे आणले. ते कापून त्यावर लेस लावली. पडद्याच्या कापडापासून बनवलेला ड्रेस आणि मोज्यांपासून बनवलेले ग्लव्स घालून सुष्मिता ब्युटी पेजेंट जिंकली होती. आजही ते दिवस आठवले तर ती इमोशनल होते. सुष्मिता म्हणते की, काहीही मिळवण्यासाठी पैशांपेक्षा जास्त इच्छा आणि आवड महत्त्वाची असते.

https://www.instagram.com/p/B-_NRbWnNAV/