26 वर्षापुर्वी मिस युनिव्हर्स बनली सुष्मिता सेन, बॉयफ्रेन्ड रोहमननं ‘जान’ लिहून दिल्या शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन हिनं 1994 मध्ये युनिव्हर्सचा किताबा जिंकला होता. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली. 21 मे 2020 म्हणजेच आज तिनं हा किताब जिंकून 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं तिला खूप रोमँटीक अंदाजात विश केलं आहे.

रोहमन शॉलनं सोशल मीडियावर सुष्मिताचा मिस युनिव्हर्सचा ताज घातलेला एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं की, “26 वर्षे, मेरी जान. तू आम्हाला सर्वांना किती प्राऊज फील करवलं आहे. आजही करवतेस. आय लव यु.”

रोहमननं शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत कपलचं कौतुकंही केलं आहे. सुष्मिता सेन दीर्घकाळापासून रोहमन शॉलला डेट करत आहे. दोघांची बाँडिंग आणि केमिस्ट्री खूप जबरदस्त आहे. लॉकडाऊनमध्ये दोघंही सोबत टाईम स्पेंड करत आहे. अनेकदा त्यांचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहे.