अभिनेत्री सुष्मिता सेन या महिन्यात प्रियकरासोबत विवाहबंधनात ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या लग्नामुळे खूप चर्चेमध्ये आहे. अनेक दिवसांपासून ती लग्न कधी करणार ? याची चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अभिनेत्री सुष्मिता सेन विवाहबंधनात अडकणार आहे. सुष्मिता मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचे कळाले होते. ती नेहमी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर त्याच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. या दोघांनी आता एक निर्णय घेतला आहे. आपलो नाते अजून पक्के होण्यासाठी ते लवकरच विवाहबंधानात अडकणार असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन येत्या नोहेंबर किंवा डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजत आहे. सुष्मिता आणि रोहमनची प्रेमकथा इन्स्टाग्रामवरुन सुरु झाली. त्याच्या प्रेमकहाणीबद्दल सांगताना सुष्मिता म्हणाली की, ‘त्याने मला डायरेक्ट इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता पण मी इन्स्टाग्रामवरील मेजेस कधीच वाचत नाही. त्यामुळे त्याचा मेसेज न वाचता तसाच राहिला. एकदा मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक त्या मेसेज क्लिक झाले. रोहमनचा मेसेज मला खूप आवडला मी लगेचच त्याला रिप्लाय दिला. तेव्हापासूनच मेसेजचा सिलसिला सुरु झाला. त्यानंतर रोहमनने मला फुटबॉल मॅच पाहण्यासाठी बोलवले तेव्हा आमची पहिली भेट झाली होती. त्यानंतर मी त्याला कॉफीसाठी बोलवले. असे करत आमच्यामध्ये प्रेम निर्माण झाले.’

सुष्मिता आणि रोहमनच्या वयात १५ वर्षाचे अंतर आहे. याआधी अभिनेत्री सुष्मिता सेन हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती. यांचे नाते जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर सुष्मिताचे नाव रणदीप हुडासोबक जोडले गेले तेही नाते फार काळ टिकले नाही. सुष्मिताने दोन मुलांना दत्तक घेतले आहे. गेल्या १५ वर्षापासून ती त्या मुलांचे पालन पोषण करत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –