‘रणवीर-सारा’च्या ‘आंख मारे’ गाण्यावर सुष्मिता सेनचा तुफान डान्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन डिज्नी प्लस हॉटस्टारवरील वेब सीरिज आर्यामधून ॲक्टींगमध्ये वापसी करणार आहे. नुकताच (शुक्रवार दि 5 जून 2020) आर्या या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका गृहिणीपासून तर गँगस्टर बनण्यापर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळत आहे. सुष्मितानं तिचा एक बिहाईंड द सीन व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. यात ती क्रू मेंबर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.

सुष्मितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत सुष्मिता सारा अली खान आणि रणवीर सिंग स्टारर सिंबा सिनेमातील आंख मारे या गाण्यावत थिरकताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या आधीच सिनेमाची शुटींग राजस्थानमध्ये सुरू होती. हा व्हिडीओ देखील तेव्हाचाच आहे.

व्हिडीओ शेअर करताना सुष्मिता म्हणते, “संदीप मोदीसोबत तुमची ओळख करून देऊयात. हे आहेत एक उत्तम डायरेक्टर जे शुटींगवर पुर्ण दिवस आम्हाला नाचवत असतात. मग पॅकअपनंतर आम्ही त्यांना नाचवत असतो.”

सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2010 मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2015 साली आलेल्या निर्बाक या सिनेमातून तिनं बंगाली सिनेमात डेब्यू केला होता. हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीनं डायेरक्ट केला होता. आता ती आर्या या वेब सीरिजमधून कमबॅक करत डिजिटल डेब्यू करत आहे.