सुष्मिता करतेय १५ वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलला डेट ?

मुंबई : वृत्तसंस्था

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाल्या आहे. काही दिवसांपूर्वी एका फॅशन इव्हेंटमध्ये रोहमन आणि सुष्मिता दोघंही एकत्र दिसले होते, तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली आहे. वयात खूप अंतर असणाऱ्या जोड्या मनोरंजन विश्वाला काही नवीन नाहीत. 43 वर्षीय सुश्मिता सध्या रोहमन शॉल या 28 वर्षीय रोहमनला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. काही काळापूर्वीच झालेल्या लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये सुश्मिताने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी रोहमन तिच्या दोन्ही मुलींसह प्रेक्षकांत बसून तिला प्रोत्साहन देत होता. अनेक वेळा विविध समारंभांमध्येही ते दोघे एकत्र दिसले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे.

‘त्यांच्या नात्याबद्दल इतक्या लवकर काही बोलणं चुकीचं ठरेल, मात्र रोहमन आणि सुष्मितामधलं नातं हे मैत्री पलिकडचं आहे आणि लवकरच ते आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील’ अशी माहिती सुष्मिता आणि रोहमनच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. सुष्मिता ४२ वर्षांची आहे तर रोहमन २८ वर्षांचा आहे. सुष्मिता सिंगल मदर आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर तिनं काही वर्षांनी दोन मुलींना दत्तक घेतलं.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a7b92af-d160-11e8-b18d-ab4fc11ef9a3′]
वयात खूप अंतर असणाऱ्या जोड्या मनोरंजन विश्वाला काही नवीन नाहीत. अगदी दिलीप कुमार-सायराबानूपासून ते मिलिंद सोमण-अंकिता कोनवरपर्यंत ही यादी लांबत जाईल. सध्या गाजत असलेल्या निक-प्रियांका, आलिया-रणबीर या जोड्यांमध्ये वयाचं अंतर बऱ्यापैकी आहे. या यादीत आता रोहमन आणि सुष्मिता सहभागी झालं आहे.

कोरेगांव पार्क येथील हॉटेल डार्क हॉर्स मधील हुक्का पार्लवर छापा

रोहमन सध्या रिनी आणि अलिशा या सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत वेळ व्यतीत करत आहे. योग्य वेळ आल्यानंतर ते दोघं आपलं नातं जगासमोर कबुल करतील असं म्हटलं जात आहे. यापूर्वी सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, मात्र सुष्मिता रितिकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

रितिक बरोबरच सुष्मिताचं नाव रणदीप हुडा सोबतही जोडलं गेलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. रणदीप सुष्मिताच्या दोन्ही मुलींची वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचा त्यामुळे सुष्मितासोबत नातं संपल्यानंतरही रणदीप खूपच नैराश्यात होता. मात्र आता रॉमनच्या येण्यानं सुष्मिता पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगत आहे.