home page top 1

सुष्मिताने १६ वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा ? फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या सिनेमांपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांमध्ये मात्र कोणतीही कमी झालेली दिसत नाही. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये तर दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुष्मिता सेन अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशलवर शेअर करत असते. सुष्मिता सोशलवर नेहमीच सक्रिय असते. सध्या ती चर्चेत आली आहे. सुष्मिताने तिचा प्रियकर रोहमन शॉलसोबतचा एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिताच्या हातात एक अंगठी दिसत आहे. तिची अंगठी पाहून तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

सुष्मिताच्या फोटोमध्ये तिच्या उजव्या हातात तिने रिंग घातल्याचे दिसत आहे. परंतु साखरपुड्याची अंगठी ही डाव्या हातात घातली जाते. सुष्मिताने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, “कोणावरही कोणत्याही अटीशिवाय प्रेम करणं कठीण असतं असं म्हणतात. आपल्या हृदयाची हाक ऐकणं हेही फार कठीण असतं. परंतु जेव्हा तुम्ही ठरवता मनात विश्वास निर्माण होतो. प्रेम तर एक बोनस आहे. माझ्या मनाची हाक ऐकत मी कोणत्याही अटीशिवाय तुझी आहे रोहमन शॉल.”

दरम्यान सुष्मिताच्या या अंगठीवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी तिला विचारले आहे की, तुझा साखरपुडा झाला आहे का? सुष्मिता अनेकदा तिचे आणि रोहमनचे फोटो सोशलवर शेअर करत असते. पण दोघांनीही आतापर्यंत अधिकृतरीत्या नात्याचा कधीच स्वीकार केला नाही हेही खरे. सुष्मिताचा हा फोटो पाहता तिची अंगठी ही केटी पेरीच्या अंगठीची आठवण करून देते. केटी पेरीलाही अशी फुलाच्या आकाराची अंगठी तिचा प्रियकर ओरलॅन्डो ब्लूमने दिली होती. केटीच्या या अंगठीची सोशलवर चांगलीच चर्चा झाली होती. तिचाही फोटो असाच व्हायरल झाला होता.

Loading...
You might also like