अभिनेत्री सुष्मिता सेनचं बॉयफ्रेन्ड रोहमानशी सर्वकाही ‘अलबेल’ ? ‘हे’ सत्य जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – नुकत्याच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झालं आहे. रोहमनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर रिलेशनशिपला घेऊन अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. रोहमनची स्टोरी पाहून वाटत होतं की, दोघांचं ब्रेकअप झालं आहे. अशातच सुष्मितानेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिताची पोस्ट पाहून लक्षात येत आहे की, दोघे अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत.

‘आय लव्ह यु रोहमन’

सुष्मिताने शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, सुष्मिता आणि रोहमन दोघेही जीममध्ये पोज देताना दिसत आहेत. आरशासमोर उभं राहून त्यांनी हा क्लिक केला आहे. हा फोटो शेअर करताना सुष्मिता म्हणते की, “He’s lean…she’s mean. I love you @rohmanshawl #backtobasics #gym #home #dubai #wegotthis… I love you guys!!!”

‘मेरे दिल को आपके साथ घर मिल गया’ : रोहमन शॉल

सुष्मिताने आपल्या पोस्टद्वारे रोहमनवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. या पोस्टमधून स्पष्ट होत आहे की, दोघांमध्ये सर्वकाही ठिक आहे. याआधी रोहमननेही एक पोस्ट टाकली होती. रोहमनच्या या पोस्टवरूनही स्पष्ट होतं की, त्यांच्यामध्ये कोणतेही भांडण झाले नाही. रोहनने इंस्टाग्राम स्टोरीवर छोटासा व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत रोहमन हातात पुस्तक घेऊन दिसत होता. या पुस्तकावर लिहिलं आहे की, “मेरे दिल को आपके साथ घर मिल गया है|” या व्हिडीओत सुष्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींसोबत दिसत आहे. या व्हिडीओत सुष्मिताचा चेहरा तर दिसत नाही परंतु तिच्या मुलींचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.

काय होती रोहमनची ब्रेकअप पोस्ट ?

रोहमनच्या ब्रेकअप पोस्टबद्दल सांगायचे झाले तर, रोहमनने आपल्या स्टोरीवर लिहिलं होतं की, “हेय, हो मी तुझ्याशी बोलत आहे. मी तुला परेशान करत आहे का? कमॉन मी इथे पूर्ण लक्ष देऊन तुला ऐकत आहे…पुढील 24 तास.”

sushmita and rohman

रोहमनने लिहिलं की, “तर तुला असं वाटत आहे का की, तू या नात्यासाठी खूप काही चांगलं करत आहे आणि तुझा पार्टनर काहीच करत नाही का? ठीक आहे! तुला हे समजण्याची गरज आहे की, तुम्ही पार्टनरसाठी जे काही करता तो तुमचा निर्णय असतो. तुम्ही तुमच्या पार्टनरकडूनही तसंच करण्याची अपेक्षा करू नका. त्यांच्यासाठी त्या गोष्टी करा ज्या खरंच तु्म्हाला त्यांच्यासाठी कराव्या वाटतात. यासाठी नका करू की, जे तुम्ही त्यांच्यासाठी करता त्यांनीही तुमच्यासाठी तसंच करावं.”

sushmita and rohman 1

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये रोहमन पुढे म्हणतो की, “जर तुमच्याशी कोणी चांगली वर्तणूक करत नसेल आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत रहात असाल तर, चूक तुमची आहे. स्वत:वर प्रेम करायला शिका.”

sushmita and rohman 2

रोहमन म्हणतो की, “तुम्ही एकटे असताना बोर होऊन जाता का? ठिक आहे, तर मग बाकी लोकांसाठी तुम्ही एंटरटेनिंग कसे वाटाल ? जर तुम्ही स्वत:लाच एंटरटेन करू शकत नसाल.”

sushmita and rohman 3

 

आरोग्यविषयक वृत्त –

५ सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे ‘वजन’ होईल कमी

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर