Sushmita Sen | ‘शेरनी इज बॅक’ सुष्मीताची नवीन पोस्ट जोरदार व्हायरल, जाणून घ्या पोस्टमध्ये काय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  Sushmita Sen | आपल्या कामाबद्दल अभिनेत्री सुष्मीता सेन (Sushmita Sen) नेहमीच निवडक आहे. ती ठरावीक चित्रपटांसाठीच काम करते. त्यामुळे सुष्मिता पद्यावर क्वचित झळकते. गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता बाॅलिवूड तसेच अभिनयापासून दूर होती. आता मात्र ती लवकरच पुनारगमन करणार असून तिची ‘आर्या’ (Aarya) ही वेब सिरीज (Web Series) प्रदर्शित होणार आहे.

 

सुष्मिता सेनने (Sushmita Sen) तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टला तिने ‘शेरनी इज बॅक’ असं कॅप्शन देत ‘या वेळी नेहमी पेक्षा खतरनाक’, असं देखील तिने लिहिलं आहे.
अर्थातच यावेळी सुष्मिता लोकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत.

 

या पोस्टमध्ये ‘आर्या’ या सिरीजचा प्रदर्शित झालेला ट्रेलर (Aarya Trailer) आहे.
यात सुष्मिता केस मोकळे सोडून तसेच पांढऱ्या रंगाची साडी परिधान करुन अतिशय रागात कॅमेराच्या दिशेत चालताना दिसत आहे.
प्रदर्शित झालेला ट्रेलर हा ‘आर्या’ सिरीजचा सिजन 2चा (Aarya Season 2) आहे.
त्यामुळे चाहत्यांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.

 

दरम्यान, सुष्मिताने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तसेच या पोस्टवर तिचे चाहते विविध कमेंट्स करत असून आता प्रतिक्षा होत नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Sushmita Sen | sushmita sen reveals arya 2 first look says sherni is back

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MNS चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन; कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !

Janhavi Kapoor | दुबईच्या समुद्रकिनारी जान्हवी कपूरने केला ‘लुंगी डान्स’

Sangli Crime | सांगलीतील सराईत पाटील टोळीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची ‘मोक्का’ कारवाई