सांगलीत बंगल्याच्या टेरेसवर महिलेची आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन  – शहरातील पुष्पराज चौक परिसरातील राजमाता हाऊसिंग सोसायटी येथे एक महिलेने बंगल्याच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली सजोता विजयकुमार पाटील (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सजोता यांचे पती विजयकुमार शासकीय व्हॅल्युएटर आहेत. पुष्पराज चौकाजवळील राजमाता हौसिंग सोसायटीतील रचना बंगल्यात ते कुटूंबासह राहतात. त्यांना दोन मुले आहेत. सोमवारी सकाळी विजयकुमार कामानिमित्त बाहेर गेले होते. मुलेही घरी नव्हती. त्यावेळी सजोत यांनी टेरेसवर अँगलला साडीने गळफास घेतला. त्यावेळी काळ्या खणीजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हा प्रकार पाहिला. आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत त्यांनी गळफास घेतला.

विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. सजोत यांचे जत तालुक्‍यात जाडरबोबलाद हे माहेर आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –