होम क्वारंटाइन असलेल्याचा संशयास्पद मृत्यू, ‘या’ कारणामुळं मृतदेह तब्बल 2 तास रस्त्यावरच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – होम क्वारंटाइन असलेल्या एका व्यक्तिचा मृत्यू झाला. मात्रा नगरपरिषदेकडे पीपीई किट आणि रुग्णवाहिकेत डॉक्टरच नसल्याने मृतदेह तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यावरच पडून होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाची तयारीही उघडी पडली आहे. मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग हा मोठ्या शहरांमधून येत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला असताना प्रशासनाची मात्र काहीही तयारी नसल्याचे आढळून आले आहे.

पुसदजवळच्या हुडी इथे राहणारा हा व्यक्ति काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधून आला होता. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला होता. आरोग्य तपासणीसाठी तो हुडीवरून पुसदला 7 किमी चालत बायकोसह आला होता. शहरात आल्यानंतर दवाखाण्यातून परत जाताना त्याला अस्वस्थ वाटून लागले.

त्युमळे तिथे तो खाली बसल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाला माहीती कळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका तातडीने पाठविली होती. मात्रा, त्यामध्ये डॉक्टरच नव्हता. तसेच पीपीई किटचाही नगरपरिषदेकडे अभाव असल्याने मृतदेहाला हात लावण्यास कुणीच तयार नव्हते. त्यामुळे तब्बल दोन तास मृतदेह तसाच रस्त्यात पडून होता.