Suspected Death of Judge | हत्या की दुर्घटना ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू, मंत्र्याच्या आदेशानंतर तपासासाठी विशेष पथक (व्हिडीओ)

धनबाद : वृत्तसंस्था – Suspected Death of Judge | धनबादमध्ये मॉर्निंग वॉकवरून परतत असलेले जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अष्टम उत्तम आनंद District and Sessions Judge Uttam Anand (50 वर्ष) यांचा बुधवारी सकाळी ऑटोच्या धडकेत मृत्यू झाला (suspected death of jharkhand judge). न्यायाधीश गोल्फ ग्राऊंडवरून फिरून परत हिरापुर वीज ऑफिसच्या शेजारील आपल्या क्वार्टरवर येत होते. रणधीर वर्मा चौकापासून काही पावलाच्या अंतरावर गंगा मेडिकलच्या समोर ही दुर्घटना झाली.

Suspected Death of Judge | dhanbad stolen auto was used to kill jharkhand dhanbad district and sessions judge uttam anand

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी ऑटो चालकाच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे (suspected death of jharkhand judge). पोस्टमार्टमसाठी डीसींच्या आदेशाने मेडिकल बोर्ड गठित करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने सायंकाळी उशीरा न्यायाधीशांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या कानातून रक्तस्त्राव झाला. ब्रेन हॅम्ब्रेजने मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसह धनबाद जिल्हा प्रभारी मंत्री बन्ना गुप्ता यांनी जजच्या मृत्यूच्या चौकशीचे
निर्देश दिले आहेत. त्यांनी डीसी संदीप कुमार व एसएसपी संजीव कुमार यांना प्रकरणाच्या
चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती बनवणे आणि एक आठवड्याच्या आत रिपोर्ट देण्यास सांगितले
आहे. त्यांनी म्हटले की, उत्तम आनंद यांच्या मृत्यूची परिस्थिती संशयास्पद आहे.

सामाजिक संस्था आणि न्याय संस्थांनी मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशी आवश्यक आहे.
मंत्री बन्ना गुप्ता यांनी उत्तम आनंद यांच्या निधनावर दुख व्यक्त केले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या
दृश्यानुसार, धडक लागल्यानंतर न्यायाधीश रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडले आणि ऑटो चालक फरार
झाल्याचे दिसत आहे.

ज्या प्रकारे ऑटो चालकाने रस्त्याच्या कडेला जाऊन न्यायाधीश उत्तम (District and Sessions Judge Uttam Anand) यांना धडक मारली आहे यावरून ऑटो चालकाच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. असे दिसत आहे की त्याने जाणीवपूर्वक धडक मारली आहे. रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याने पोलीस तपास करत आहेत. न्यायाधीशांच्या पत्नीने याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी धावपळ सुरू केली.

हे देखील वाचा

Thane Crime | औरंगाबादमधील पोलिस कर्मचार्‍याचा मृतदेह ठाण्यातील फुटपाथवर आढळल्याने प्रचंड खळबळ

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवडयात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Suspected Death of Judge | dhanbad stolen auto was used to kill jharkhand dhanbad district and sessions judge uttam anand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update