Thane : मनसे पदाधिकार्याचा संशयास्पद मृत्यू, प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका बाजूला वीज बिलाच्या मुद्यावर मनसेनं आक्रमकपणे आंदोलन पुकारलं आहे. दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख असं त्यांचं नाव आहे. जमील शेख यांची अज्ञात हल्लेखोराने डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे. जमील शेख यांची अज्ञात हल्लेखोराने हत्या केली आहे. जमील शेख यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. जमील यांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
२७ ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी परिसरात मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार केला. परंतु, ज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर १३ दिवसांच्या शोध कार्यानंतर मुख्य आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या काही तासांतच सीडीआर लोकेशनच्या मदतीनं मुरबाडमधून चार आरोपींना नाकाबंदी दरम्यान अटक केली होती. पण, मुख्य आरोपी डी मोहन आणि त्याचे साथीदार फरार झाले होते.