ग्राहक नसताना देखील दरमहा 65 हजार ‘रेंट’ देऊन उघडली दुकानं, 20 संशयास्पद मुस्लिमांवर सुरक्षा यंत्रणांची ‘नजर’

तरणतारण (पंजाब) : वृत्तसंस्था – दहशतवादी कारवाया सातत्याने पुढे येत असलेला, तरणतारण हा पंजाबमधील सीमावर्ती जिल्हा. केवळ राज्यच नाही तर देशातील सुरक्षा संस्था देखील येथील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सुरक्षेसंबंधी एक आश्चर्यकारक प्रकरण येथे समोर आले आहे. शहरात गेल्या दीड वर्षात मुस्लिम समाजातील सुमारे वीस जणांनी दुकाने भाड्याने घेऊन कपड्यांची विक्री सुरू केली आहे. या दुकानांचे भाडे ३० ते ६५ हजार रुपयांपर्यंत आहे आणि विक्री मात्र काहीच नाही. दुकानांच्या आकाराविषयी बोलायचे, तेही फार मोठे नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, असे संशयास्पद दुकानदार या शहरातच राहत असून ते राहत असलेल्या घरांचे भाडेही १० हजार आणि त्याहून अधिक आहे. त्याच वेळी, जर आपण दुकानांमध्ये ग्राहकांच्या संख्येबद्दल बोललो तर ते नगण्य आहे. या लोकांसाठी लंच देखील कोणत्यातरी हॉटेलमधून येते. हे लोक अचानक येथे येऊन कसे स्थायिक झाले? कुठून आले ? आणि इतका पैसा कसा आणि का खर्च केला जात आहे? हा सुरक्षा यंत्रणांसाठी देखील प्रश्न बनला आहे. उत्तर शोधण्यासाठी एजन्सी या लोकांवर लक्ष ठेवून आहेत.

संशयितांची माहिती घेणे सुरु :
एडीसी संदीप रिषी यांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनी आणि इमारतीच्या मालकाला भाडेकरूंनी माहिती देणे आवश्यक आहे, या संदर्भात त्यांनी आदेशही जारी केले आहेत. असे न करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. येथील सीमावर्ती जिल्हा तरणतारण येथील श्री दरबार साहिबला लागून असलेल्या गरदा बाजार व तहसील बाजार या दोन्ही बाजारपेठा, कपडे, सोनार, मुनियारी, स्टेशनरी, मिठाई आणि इतर व्यवसायांची दुकाने बर्‍याच दिवसांपासून आहेत. यातील १० टक्के दुकाने भाड्याने आहेत.

बाजाराचे जुने व्यापारी त्यांची नावे जाहीर न करण्याच्या अटीवर सांगतात की येथील दुकानांचे भाडे जास्तीत जास्त २० ते ३० हजार रुपये आहे. ते म्हणतात की दीड वर्षापूर्वी अचानक येथील मुस्लिम समाजातील लोकांनी तीच दुकाने ३० ते ६५ हजार रुपयांना भाड्याने घेतली आणि तेथे महिलांचे कपडे विकायला सुरुवात केली. आतापर्यंत वरील लोकांनी जितके भाडे दिले आहे तितका देखील माल या दुकानांमध्ये नाही.

सुरुवातील पोलिसांचे दुर्लक्ष :
सामाजिक कार्यकर्ते अश्विनीकुमार कुक्कू यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाला याबाबत वर्षभरापूर्वी माहिती देण्यात आली होती. असे असूनही, प्रशासनाने या लोकांचा तपशील मिळविला नाही किंवा या लोकांना बोलावले नाही आणि हे लोक कोठून आले आहेत आणि ते कोठून पैसे खर्च करीत आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

संबंधित पोलिस ठाण्याचे एसएचओ गुरचरण सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या लोकांचा तपशील मिळविला जात आहे. या दुकान मालकांनाही बोलावण्यात आले आहे. पूर्ण अहवाल तयार करून उच्च अधिकाऱ्यांना दिला जाईल.

Visit : Policenama.com