वेश्या व्यवसायासाठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणारा अटकेत

वसई : पोलीसनामा ऑनलाईन

वेश्याव्यवसायासीठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळ्यात वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीने बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींची फसवणूक करुन भारतात आणले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीने मागील वर्षभरात पाचशे मुलींची तस्करी केल्याचे तपासात उघड झाले असून या प्रकरणातील इतर ११ आरोपी अद्याप फरार आहे.
[amazon_link asins=’B071KFZG8B,B00B3QKQ40′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’019aca14-b1f7-11e8-b790-3b4379722082′]

आरोपी सैदुल (वय ४०) हा बांग्लादेशातल्या गरीब मुलींना भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना तो बेकायदेशीरपणे भारतात आणत असे आणि विविध ठिकाणी कुंटणखान्यात शरीर विक्री करण्यासाठी विकत असे. मागील वर्षी पोलिासांनी वेश्याव्यवसायावर छापा टाकून चार मुलींची सुटका केली होती. या चार मुली बांग्लादेशी होत्या आणि त्यांना फसवून या व्यवसायात आणण्यात आले होते.

तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होती. मात्र, टोळीचा म्होरक्या सैदुल (वय ४०) पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, हितेंद्र विचारे यांच्या पथकाने सैदुलला अटक केली.
[amazon_link asins=’B00JJIDBIC,B0744L38KK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b435369-b1f7-11e8-91d3-4396d4c2ff34′]

सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांग्लादेशाच्या सिमेवरून चोरट्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा. अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणांनी ५० ते ६० हजारात विकायचा. यानंतरही दरमहिन्याला त्याला कुंटणखान्यातून या मुलींच्या मोबदल्यात ठराविक रक्कम मिळत असे. वसईत त्याच्याविरोधात ४ गुन्हे दाखल असून मुंबई, पुणे आदी ठिकाणी त्यांने मुली पुरविल्याचे पोलिसांना सांगितले. मागील वर्षभरात त्याने किमान ५०० मुलींना भारतात आणून विकले होते. या मुलींना शरीर विक्री करण्यास भाग पाडून कुंटणखान्यातून त्यांना दरमहा ५ हजार रुपये मिळायचे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

You might also like