पतीसह राहताना पत्नीनं दुसऱ्याशी केलं ‘प्रेम’, जमलं नाही म्हणून तिनं तिसर्‍यावर धरला ‘नेम’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसाधारण कुटुंबातील महिलेने नवऱ्याऐवजी एका व्यक्तीवर प्रेम केले. काही दिवस त्यांचे प्रेमळ संबंध होते. मात्र, तिने अचानक या प्रियकराशी देखील दुरावा केला. त्याला सोडून ती आणखी तिसऱ्याच व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने तिला मोठी किंमत चुकवावी लागली.

शारदा अरविंद शिंदे (वय-33 रा. चिंतामणीनगर, गिट्टीखदान) ही विवाहित महिला सिनेमॅक्स येथे नोकरी करीत होती. तिची तीन वर्षापूर्वी प्रॉपर्टी डिलिंगचे काम करणाऱ्या चंद्रकांत वाणीबरोबर ओळख झाली. चंद्रकांत वाणी याचे वय 47 असून तो शुंभकर सोसायटीत वास्तव्यास आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झालं. दोघेही विवाहीत असताना फक्त शारिरीक संबंधासाठी या दोघांनी या नात्याला पसंती दिली. दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, चंद्रकांत कडून शारिरीक भूक भागत नसल्याने शारदाचे अन्य एका युवकाशी प्रेमसंबध निर्माण झाले. याचा संशय चंद्रकांतला होता. त्यामुळे त्यांच्या अबोला होता.

29 नोव्हेंबर रोजी शारदाने चंद्रकांतला फोन केला. फोन करून माझे आता कुणाशीही प्रेमसंबंध नसल्याचे त्याला सांगितले. त्याचप्रमाणे तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच दिवशी वाडी येथील मारुती सेवा येथे त्यांची भेट झाली. त्यांनी 2 डिसेंबरला भेटू असे चंद्रकांतने शारदाला सांगितले होते. त्यानुसार शारदा सकाळी सव्वासातच्या सुमारास वाडी बसथांबा येथे आली. त्याठिकाणी दोघांची भेट झाली. तिला घेऊन तो सिनेमॅक्स येथे आला. शारदा काहीवेळातच परत आली.

शारदाचा मृतदेह विहिरीत सापडला
शारदा बाहेर आल्यानंतर तिला घेऊन चंद्रकांत बुटीबोरीकडे गेला. बुटीबोरी ते उमरेड मार्गावरील मरसघाट शिवारात त्याने पटेल यांच्या शेतात कार थांबवली. या ठिकाणी शारदाला विहिरीजवळ घेऊन गेला. तिला विहिरीत ढकलून दिले. ती पाण्यात बुडत असताना त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर चंद्रकांत तेथून निघून गेले. 4 डिसेंबर रोजी सकाळी अंकुश पंधराम यांना विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान, शारदाचा पती अरविंद याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार गुट्टीखदान पोलीसांकडे केली. नेहमीप्रमाणे शारदा कामावर गेली मात्र ती परत घरी आली नसल्याचे पतीने तक्रारीत सांगितले.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा
शारदाच्या पतीने गुट्टीखाना पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी व्हेरायटी चौकातील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये शारदा ही लाल रंगाच्या वॅगन आर कारमधून सिनेमॅक्स येथे गेली आणि काही वेळातच ती बाहेर आली. त्याच कारमध्ये बसून ती वर्धा मार्गाने गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी वर्धा मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये एमएच 31 सीएन 4762 या कारचा नंबर एका सीसीटीव्हीत पोलिसांना मिळाला.

ती कार विजय एकनाथ वाणी याच्या नावावर होती. त्यामुळे गुन्हे शाखाने विजय वाणी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ही कार भाऊ चंद्रकांत वाणी हा चालवत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शारदाचे अन्य लोकांसोबत संबंध होते त्यामुळे तिचा खून केल्याचे चंद्रकांतने पोलिसांना सांगितले. चंद्रकांतला गुट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास गुट्टीखदान पोलीस करीत आहेत

Visit : Policenama.com