३ पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, ईद बंदोबस्ता दरम्यान वाहनांची तोडफोड भोवली

हिंगोली : पोलीसानामा ऑनलाइन – ईद बंदोबस्ता दरम्यान पायी पेट्रोलींग करत असताना रस्त्यावरील उभा असलेल्या वाहनांवर शासकीय लाठीने मारून त्यांचे नुकसान केल्याप्रकरणी हिंगोली पोलिस दलातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. पोलिसांनी वाहनांचे नुकसान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हिंगोली शहर पोलिस ठाण्यातील गणेश वाबळे (बक्कल नं. ९४६), विलास शिनगारे (बअक्कल नं. ३११) आणि हिंगोली पोलिस मुख्यालयातील नितीन रामदिनेवार (बक्कल नं. ४२८) अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद सणानिमित्त वाबळे, शिनगारे आणि रामदिनेवार यांची बंदोबस्तासाठी नेमणुक करण्यात आली होती.

हिंगोली शहरातील मस्तानशहानगर येथे आल्यावर तिघा पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या शासकीय लाठीने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारसायकल आणि अ‍ॅटोचे नुकसान केले. त्याबाबची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. तिघांनी पोलिस दलातील प्रतिमा मलिन केल्याने त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केली आहे. या कारवाईमुळे हिंगोली पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like