विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणारा सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

जेवण केल्यानंतर मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून पैसे उकळणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास सोमवारी रात्री निलंबित करण्यात आले. बाबासाहेब पाटील असे त्याचे नाव आहे.  या प्रकाराचे सांगली जिल्हा सुधार समितीने ‘व्हिडिओ चित्रीकरण’ करुन तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई केली.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0da4eee3-b5de-11e8-8aaf-bba90258c800′]

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील दोन विद्यार्थी जेवणानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गेले होते. त्याचवेळी गस्तीच्या पोलिसांनी त्यांना का फिरत आहात, अशी विचारणा त्यांना करून जबरदस्ती गाडीत बसवून मिरज शहर पोलीस ठाण्यात नेले होते. दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधार समितीच्या नितीन मोरे यांना मदतीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब पाटील याने या विद्यार्थ्यांकडे पाच हजार रुपये द्या, अन्यथा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. समितीच्या मोरे यांनी कांबळे यांना याचा जाब विचारला. पण विद्यार्थ्यांचं शिक्षण व पुढील आयुष्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाटील यास दोन हजार रुपये देतो, गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली.

पाटील व विद्यार्थ्यांच्या पालकांमधील संवाद सुधार समितीचे नितीन मोरे यांनी मोबाईलमधील कॅमेर्‍यात कैद केला होता. याची चित्रफीत सोशल मिडियावरून व्हायरलही झाली होती. यासंदर्भात समितीने पोलिस अधीक्षक  सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे शर्मा यांनी पाटीलला तडकाफडकी निलंबित केले.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14270a30-b5de-11e8-8a67-7b6cedc76e6f’]

यापुढे  गोरगरीब व असाह्य जनतेची लुबाडणूक करणाऱ्यांना असाच धडा शिकवला जाईल. तसेच कायदा हा सामान्यांच्या रक्षणासाठी वापरण्यासाठी सुधार समिती कायम सक्रिय राहिल, असे समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे  तानाजी रुईकर, रविंद्र ढोबळे, जयंत जाधव, युवराज नायकवाडे, प्रविण कोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती केली आहे. चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. तसेच पाटील याची खातेनिहाय चौकशीही करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईने मिरज शहर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.